वस्तीशाळा बनली डिजीटल शाळा

0
12

सुरेश भदाडे

देवरी,दि.21-समाजातील विविध घटकांच्या मदतीचा हात मिळाल्यामुळे एकेकाळी वस्तीशाळा असलेली जि.प. प्राथमिक शाळा पदमपूर सिरपूर शाळा आता ‘डिजीटल शाळा’ म्हणून देवरी तालुक्यात नावारुपास आली आहे. आदिवासी नक्षलग्रस्त भागात असलेल्या या शाळेतील  विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकावे असे शिक्षण देण्याची तयारी शिक्षकांनी केली आहे.डवकी केंद्रातर्गंत येत असलेल्या या वस्तीशाळेला भेट देऊन पंचायत समिती सदस्य मेहतरलाल कोराम यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पर्वावर डिजिटल शाळेचे उदघाटन करण्यात आले.तर आमदार संजय पुराम यांनही शिक्षकांचे कौतुक केले आहे. 
ही शाळा सुरूवातीला वस्तीशाळा होती. मात्र केंद्रप्रमुख ई.एन. येळण, शिक्षक आर.वाय. बारसे, एस.एल. पौनीकर यांच्या मेहनतीमुळे बालकांना उत्तम शिक्षण देत सर्व सोयी सुविधा उपयुक्त डिजीटल शाळा तयार करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी, केंद्रातील शिक्षकांनी आणि समाजातील विविध घटकांनी मिळून या शाळेला मदतीचा हात दिला. परिणामी देवरी तालुक्यात ही शाळा डिजीटल शाळा म्हणून पुढे आली.
अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. येटरे, अतिथी म्हणून सरपंच नहरसिंग एंडकी, गजानन शिवणकर, शामकला बारसे, डी.बी. दिघोरे, केंद्रप्रमुख ई.एन. येडणे, प्रमोद ब्राम्हणकर, श्यामराव सिंधीमेश्राम, धनिराम कोडवते, नामदेव कोसरकर, नंदलाल मडकाम, संदीप तडके, रमेश उईके, कला सरोटे, किशोर गज्रे, हेमके, उपस्थित होते.संचालन के.बी. गभणे यांनी तर आभार एन.आर. लांजेवार यांनी मानले.