श्री शिवछत्रपती मराठा समाजतर्फे शिवाजी महाराज जयंती

0
10

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व श्री शिव छत्रपती मराठा समाजाच्या संयुक्तवतीने मनोहर चौकातील नियोजित स्थळी छत्रपतींची ३८८ वी जयंती मराठा समाजाच्या महिला अध्यक्ष द्वारकाताई सावंत यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. तर माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे अघ्यक्ष अशोक इंगळे, सामाजिक कार्यकर्ता उदय प्रमर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अँड. कृष्णकांत शेंडे, माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, समाजाचे सचिव दीपक कदम, नगर परिषद मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सोनावने, शहर पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, स्थानिक गुन्हे शाखेचे जैराज रन्नवरे, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश रहांगडाले, झाडीबोली साहीत्य कला मंचचे कलाकार जीवन लंजे, पुष्पक जसानी, भरत क्षत्रीय, सीमा डोये, नगरसेविका भावना कदम, सुनिता तरोणे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी सुराज्य व स्वराज्याचे संस्थापक म्हणून इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी आठवण करणार असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान समाजातील चिमुकल्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. आभार दीपक कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.