विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार-प्राचार्य बंशीधर शहारे

0
38

आमगाव,दि.08ः तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे शिक्षक पालक संघाची सभा प्राचार्य बंशीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.सभेला संबोधित करताना प्राचार्य बन्सीधर शहारे यांनी विद्यार्थ्यांना केंद्र बिंदू ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शालेय गुणवत्ता, शारीरिक व मानसिक विकास, शिस्त, संस्कृती, संस्कार, खेळ, शालेय शैक्षणिक उपक्रम राबविणे यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावा, त्यांच्या चांगल्या कार्याची प्रशंसा करावी, चुकीचे वर्तन केले असल्याचे निदर्शनास आले तर त्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा न करता जास्तीचे गृहकार्य देणे, मुल्यमापनाचे प्रश्न विचारणे,अशी शिक्षा द्यावे.मुलींची आईने मैत्रीण बनून,तर मुलांचं वडीलांने मित्र बनून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.या सभेला हायस्कूल विभाग उपाध्यक्ष हुकमीचंद गोदॆलॆ, कनिष्ठ महा.विभाग उपाध्यक्ष पांडुरगजी क्षिरसागार ,सदस्य दुर्योधन सोनवानॆ,सिमा बोपचॆ,सुरेश चव्हाण,आर.एच बंद्रे,जे.एन.तितिरमारे,पी.एम.चुटे,आर.एस.कामथे उपस्थित होते.संचालन कॆ.जे.बर्वे यांनी केले तर आभार डी.एस.मॆहर यांनी मानले.