देवरी येथील प्रकल्प अधिकारी पदी आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नियुक्त करा

0
56

राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती व बिरसा फायटर्स यांची निवेदनातून मागणी.

देवरी,ता.०८: देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाई व दुर्लक्षितपणामुळे आदिवासी आश्रमशाळा हे आदिवासी विद्यार्थ्याच्या शोषणाचे, लुटीचे,स्वातंत्र्य व बालहक्क हिरावून घेणारे केन्द्र ठरले आहे. तरी देवरी येथील तत्कालिन प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्या जागी आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नियुक्त करा, अशा मागणीचे निवेदन विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती व बिरसा फायटर्स यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना गेल्या मंगळवार (दि.4) रोजी सादर केले.
दिलेल्या माहितीनुसार, देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या अकार्यक्षमतेमुळे आश्रमशाळा हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शोषणाचे,लुटीचे,स्वातंत्र्य व बालहक्क हिरावून घेणारे केन्द्र ठरले आहे.कुठे जेवण अत्यंत निकृष्ठ दर्जाचे तर कुठे अंथरून-पांघरून नाही. एकाच मिणमिणत्या दिव्याखाली डोळे फोडून एकाच पुस्तकातून चार-चार विद्यार्थी अभ्यास करतात. त्यांचे आरोग्य तपासणी व औषधोपचार वेळेवर केले जात नाही. अस्वच्छ वातावरण, अपूरे जेवण व मानसिक दडपणाखाली हे विद्यार्थी कसे शिक्षण घेतील? कशी आपली प्रगती करतील ? आता तर दररोज या विद्यार्थ्याच्या जीवावर उठणा-या घटना घडत आहेत. यामुळे प्रोग्रेसिव्ह इंटरनेशनल स्कूलमध्ये जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे ह्या विद्यार्थ्याचे पालक चिंतेत आहेत. अशाप्रकारच्या विद्यार्थ्याच्या समस्या सोडविण्यात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार हे अकार्यक्षम आहेत.
तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याने तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्या जागी आय.ए.एस.दर्जाचे अधिकारी नियुक्त करून आदिवासी विद्यार्थाचे भविष्य वाचवावे. जर आमची मागणी पूर्ण न झाल्यास या मागणीला धरून आम्ही उग्र जनआंदोलन करू. यात परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ईशारा ही या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करणा-यांमध्ये विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती गोंदियाचे अध्यक्ष हेमलता आहाके, उपाध्यक्ष शोभा कुसराम, सचिव मालती किन्नाके, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पंधरे, प्रदेशाध्यक्ष शामराव उईके, पत्रकार उषाकिरण ताराम, बिंदू कोडवते, सरिता भलावी, मंजू लट्ये, सावित्री गेडाम, गंगा उईके, अश्विनी पुराम, योगिता गेडाम, गीता तुमडाम, लता मडावी, वनिता सलामे, गीता सलामे, मनिषा कुंभरे, बबिता कुंभरे, दुलिचंद धुर्वे, कैलास मरकाम, रामेश्वर भलावी, भाऊलाल टेकाम, हिवराज टेकाम, राजेन्द्र उईके, राजेश वट्टी, हेतराम वाळवे, राजेन्द्र मडावी, लोकेश सराटे, भुमेश्वर मलगाम, भजनलाल सयाम, जितेन्द्र उईके, राजेश मरकाम, संतोष उईके, प्रल्हाद भलावी, जगदिश मरकाम, आदिल भलावी, विनोद उईके, इंतोष कुसराम, सुनील मरसकोल्हे, परमेश्वर धुर्वे, शिला मरकाम, गीता मसराम, कांता मरकाम, शामकला मरकाम, भावना उईके, बबीता उईके, शैलेन्द्री मडावी, लक्ष्मी फरदे, लता फरदे, लता पंधरे, ज्योती मरसकोल्हे, रंजनी वरठे यांचा समावेश होता.