डॉ.प्रा.वर्षा गंगणे यांना महिला ग्रंथ पारितोषिक जाहीर

0
22

देवरी,दि.१८-स्थानिक मनोहरभाई पटेल कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा. वर्षा गंगणे यांना मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने देण्यात येणारा “मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम” महिला ग्रंथ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

जालना येथील जेईएस महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४५व्या राष्ट्रीय अधिवेशनातील समोरोपिय कार्यक्रमादरम्यान (दि.७ नोव्हेंबर) पार पडणार आहे.

पूर्व विदर्भातील लेखिका डॉ.प्रा.वर्षा गंगणे यांच्या “कोरोना परिणाम आणि आत्मनिर्भर भारत” या पुस्तकास हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  सन्मानचिन्ह आणि रोख ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या परिषदेत त्यांचे “राजस्व” हे एम ए अर्थशास्त्राचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुरस्काराबद्दल डॉ.गंगणे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.