अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुलीचा एमबीबीएसचा प्रवेश सुकर

0
36

एका दिवसात दिले जातपडताळणी प्रमाणपत्र

नागपूर: जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे चोवीस तासात एका मुस्लिम तरुणीला जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याने तिला शेवटच्या दिवशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता आला.इन्शारा जावेद नदीम या मुस्लीम ओबीसी मुलीला सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला होता. नियमाप्रमाणे प्रवेश घेता वेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.पण या मुलीने त्यासाठी अर्ज केला नव्हता. प्रवेश घेण्याची मुदत संपायला आली होती.शेवटचा दिवस होता.जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे इन्शाराचा प्रवेश अडला होता.शेवटच्या दिवशी पालकांनी अर्ज केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार यांनी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देश दिल्यावर आपले सहकारी संशोधन अधिकारी आशा कव्हाळे यांच्या मदतीने चोवीस तासाच्या आत इन्शाराला जात प्रमाणपत्र दिले.त्यामुळे तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता आला.