मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये बालदिवस उत्साहात

0
16

गोरेगाव:- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सान्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये 14 नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिवस म्हणुन उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक प्रा. आर. डी. कटरे हे अध्यक्ष, तसेच शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, शाळेच्या प्राचार्या सौ. सी. पी. मेश्राम, तसेच स. शि. आर. एम. कटरे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रा. आर. डी. कटरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सी. बी. पटले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात दिवाळी सुट्टीमधे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या दिवाळी हॉलिडे पुस्तकाचे गुणदान करून उत्कृष्ठ लिखाण केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडून बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 8 वी ची विद्यार्थिनी कु. निधी राहुल कटरे, कु. अलिशा परमानंद रहांगडाले तर आभार कु. सोनाली सुरेश राऊत हिने मानले.