राष्ट्रवादी काँग्रेसने 40 ग्रामपंचायत निवडणूकीवर केले लक्ष केंद्रीत

0
21

अर्जुनी मोरगाव- तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील होणाऱ्या 40 (चाळीस) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंबंधाने बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये आमदार मनोहरराव चंद्रीकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे , माजी जि. प. सदस्य किरणताई कांबळे, रतीराम राणे, बंडूभाऊ भेंडारकर , माजी जि. प. किशोर तरोणे,योगेश नाकाडे, भोजरम राहिले, पंचायत समिती सदस्य पुष्पलताताई द्रूगकर,उध्दव मेहदंळे मान्यवर इतर उपस्थित होते.
आमदार चंद्रिकापुरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की 40 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक आहे. गाव गाडा चालवतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी समवैचारिक पक्षाशी शक्य असल्यास मनोमिलन करून निवडणूक लढवावी. गावामध्ये पक्षातील किंवा इतर समविचारी पक्षातील लोकांशी, कार्यकर्त्यांशी हेवेदावे, दुरावा असला तरी ते याप्रसंगी बाजूला ठेवून मनोमिलन करून पक्षाचे ध्येय धोरण लक्षात घेता खासदार प्रफुल पटेल यांच्या विचारांना समोर ठेऊन एकाच छताखाली यावे असे आवाहन केले. ग्रामपंचायत हातात कशी येईल, राष्ट्रवादीचा झेंडा ग्रामपंचायतवर कसा फडकेल यासाठी परिश्रम घ्यावे, अशी सुचना केली.आम्ही आपणा सर्वांसाठी सदैव तत्पर आहोत.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी, ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीच्या झेंडा फडकवण्यासाठी आपसातील हेवेदावे टाळावे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजिनिअर यशवंत गणवीर म्हणाले की, पक्षाचे ध्येय धोरण राबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांचे विचार रुजवावे.तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी प्रास्ताविक केले. चाळीस ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून अधिकाधिक सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कसे निवडून येतील या संबंधित ध्येय धोरण आखण्यास सांगितले.
याप्रसंगी गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष इंजिनियर यशवंत गणवीर तसेच सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष इंजिनिअर हेमकृष्ण संग्रामे यांची शिरेगाव बांध ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक गावातील निवडणूक व विकास कामासंदर्भात मनोगत व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहंदळे व उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर ब्राह्मणकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुशीला हलमारे ,युवती अध्यक्ष हर्षा राऊत, सामाजिक सेलचे तालुकाध्यक्ष आर के जांभुळकर , डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर दीपक राहिले, राकेश जयस्वाल ,निशाताई मस्के, कविताताई ठवरे, विशाखा लोथे ,संजय ईश्वार ,सुखदेव मेंढे, संजय उजवणे, ऋषीजी पुस्तोडे ,सदाशिव घुगुसकर ,उल्हास डोंगरवार, रमेश लंजे ,सर्वेश धांडे ,गोपाल आवरासे ,सुनील बुराडे, मोरेश्वर रहेले तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.