34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home शैक्षणिक स्व.ब्रीजलाल कटरे हायस्कुलच्यावतीने पर्यावरण रॅली

स्व.ब्रीजलाल कटरे हायस्कुलच्यावतीने पर्यावरण रॅली

0
38

blank

गोरेगाव,दि.०२- तालुक्यातील स्व. ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी शाळेतर्फे पर्यावरण संरक्षण सायकल रॅली ,क्षेत्र भेट, वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम शाळेतून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सायकल रॅली काढून गावात जनजागृती करण्यात आली. रॅलीचे समापन शिवमंदिर परीसर धानूटोला येथे करुन परिसराची साफसफाई करण्यात आली.महामानव बीरसा मूंडा यांच्या प्रतीमेचे पूजन करुन वनभोजन/स्नेहभोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी शहारवानी ग्रामचे उपसरपंच तुकाराम गौतम,पोलीस पाटील तेजलाल पटले,तं.मू.अध्यक्ष सुरेश नेवारे,वी. का.सेवा सहकारी अध्यक्ष मानिकलाल गौतम,ग्रा.पं.सदस्य छगनलाल गौतम,शा.व्य.समिती अध्यक्ष राजेश पटले, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष भोजराज तूरकर, से. नी. मूख्याध्यापक एच. बी.पटले, माजी प.स.सभापती महाराजसिंग कोडापे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक बोरकर,किरण पालेवार,विनोद गौतम,गूड्डूूजी बिसेन,राजेश पारधी,दिप्ती पटले,तुलसीताई रहांगडाले,मनोज पटले,सुरेश राऊत,कृष्णकूमार कटरे,व शाळेचे मुख्याध्यापक  आर. वाय.कटरे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

blank