जखमी अवस्थेतील सारस पक्ष्याने अखेरचा श्वास घेतला

0
20

 गोंदिया- जिल्ह्यातील दासगाव डांगोर्ली परिसरात 25 नोव्हेंबरला जखमी अवस्थेत आढळलेल्या सारस पक्षाच्या 1 डिसेंबरला सायकांळी नागपूरातील गोरेवाडा प्राणीसग्रंहालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या 15 दिवसात एक जोडप्यासह एका पिल्याच्या मृत्यू झाल्याने सारस संर्वधनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमी सारस पक्ष्याला 30 नोव्हेंबरला नागपूरला उपचाराकरीता हलविण्यात आले होते.सारस पक्ष्याच्या या पिल्याला विषबाधा झाल्याने तो दलदल जमीनीत पडला आणि तिथे त्याचे पंख फसले गेल्याने उडू शकला नाही.आणि रात्रभर त्या किचड असलेल्या दलदल जागेत फसून राहिल्याने त्याच्या शरिराला हलचल करता आली नाही. 4 दिवसापासून सारस पक्ष्याचे हे पिल्लू व्यवस्थित होते,मात्र 1 डिसेंबरला गोरेवाडा येथे उपचारादरम्यान मृत पावल्याची माहिती दासगाव क्षेत्राचे सहाय्यक वनक्षेत्रसहायक एस.जे.दुर्रानी यांनी दिली.