गोरेगाव,दि.09ः-स्थानिक पी.डी.राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उदघाटन पार पडले.आजच्या उद्घाटनिय सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजभाऊ राहांगडाले हे होते.तर उदघाटक म्हणून पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपसभापती राजकुमार यादव,जिल्हा परिषद सदस्य डाॅ.लक्ष्मण भगत,माजी सभापती चित्रलेेखाताई चौधरी,पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे,शितलताई बिसेन,सुप्रियाताई गणवीर,माजी जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे,गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे,ग्रामहिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.टी.पी.येळे,संचालक यु.टी.बिसेन,माजी प्राचार्य पी.एफ.बघेले,प्राचार्य वाय.आर.चौधरी,सी.डी.मोरघडे,बालवैज्ञानिक,मार्गदर्शक शिक्षक,व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनीचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे यांनी केले.विज्ञान प्रदर्शनात 58 प्रदर्शनीय माॅडेल ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे यांनी तर आभार प्रदर्शन बी.बी.बहेकार विषयतज्ञ यांनी केले.




