महाडिबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित भरावे

0
5

समाज कल्याण विभागाचे आवाहन

          गोंदिया,दि.28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो. शैक्षणिक सत्र 2022-23 करीता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणाली दिनांक 22 सप्टेंबर 2022 पासून कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. मागील वर्षाचे तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आतापर्यंत 77 टक्के अर्ज भरण्याची नोंद झालेली आहे, तसेच समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर महाविद्यालयाकडून अर्ज सादर करण्याकरीता महाडिबीटी प्रणालीवर स्क्रुटीनी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 पासून कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.

        तरी जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयांच्या प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींचा अर्ज भरण्याकरीता समान संधी केंद्रामार्फत मार्गदर्शन करावे व नियमीत पाठपुरावा करावा. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. करीता संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज दिनांक 30 जानेवारी 2023 पर्यंत तपासून पात्र अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. असे आवाहन विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.