“एक दिवस शाळेसाठी” अभियानात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घेतला आरोग्यपाठ

0
10

गोंदिया-शालेय शिक्षण विभाग यांचे मार्गदर्शक सुचना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे “दप्तर मुक्त शनिवार ” अभियानातील सुचनानुसार आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दि.28 जानेवारी वार शनिवारी रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा तांडा केंद्र खमारी येथे भेट देऊन खुल्या वातावरणात आरोग्य परिपाठ घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद करून विविध आरोग्य बाबतचे महत्त्व मुलांशी हितगुज केले. मुलांची मेंदूची चंचलता,चाणाक्ष बुद्धी, तलख असते व त्यांना सांगितलेले सर्व गोष्टी ते लक्षात ठेवुन सर्व गोष्टी ते घरी पालकांशी सांगत असतात हीच जमेची बाजू बघता मुलांना आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण बाबी त्यांच्या भाषेत हातवारे व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांना सांगितल्यास ते घरातील पालक, आजी-आजोबा, नातेवाईक, मित्र व परिवारातील लोकांशी दिलखुलास गप्पा मारत असतात
आज डॉ. वानखेडे यांनी मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवुन प्रत्यक्ष हात धुण्याच्या पद्धतीबाबतचा पाठ शिकवला व प्रात्यक्षिकही करून दाखवले तसेच त्याचबरोबर सध्या सुरू होणारे मोहिम जसे स्पर्श कुष्ठरोग, हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार व बेटी बचाव -बेटी पढाव इत्यादी बाबतचे सोपे सोपे बाबी खास त्यांच्या भाषेत समजावून सांगितले जेणेकरून आरोग्य विभागामार्फत हत्तीपाय आजाराबाबतच्या गोळ्या खाऊन हत्तीपाय सारख्या गंभीर व विकृती आजाराला रोखता येऊ शकते. तसेच शरीरावरील त्वचेपेक्षा फिक्कट किंवा  लालसर रंगाचा,त्रास न देणारा  चकाकणारा ,न खाजणारा चट्टा दिसतात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रची भेटी देऊन डॉक्टरांकडून तपासून घेणे. प्राथमिक स्तरावर आजार ओळखल्यास प्रतिबंधात्मक उपचार घेऊन आजार रोखता येऊ शकतो.
घरातील केरकेचराचे व्यवस्थापन नीट केल्यास व स्वच्छता ठेवल्यास परिसरातील माशा तसेच पाणी साचवु न दिल्यास मच्छरांची पैदास न होता किटकजन्य आजावर प्रतिबंध केल्यास हिवताप, डेंग्यु,रोगावर आळा घालण्यास मदत होते . जेवणापुर्वी हात धुणे, शौच झाल्यावर हात धुणे,झोपण्यापुर्वी दात साफ करणे अशा विविध पैलुवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळेत पुरवठा देत असलेल्या जेवणात दिल्या जाणाऱ्या मिड- डे मिल ची तपासणी करण्यात आली.