विद्यापिठ अभ्यास मंडळावर डाॅ. संजीव राहांगडाले

0
22

गोंदिया– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. सुभाष चौधरी यांनी जगत महाविद्यालय गोरेगाव येथील प्राध्यापक डाॅ. संजीव राहांगडाले यांची रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत
तीन सदस्यांची नियुक्ती करावयाची होती. याअंतर्गत डॉ. संजीव रहांगडाले यांची निवड करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठ अंतर्गत पदवी अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षांचे नियंत्रण व मूल्यांकन करणे, विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी कार्यवाही करणे यासह आदी कामे त्यांना पार पाडावी लागणार आहेत. डॉ. रहांगडाले यांनी आपल्या
नियुक्तीचे श्रेय संस्थाध्यक्ष जगतरामजी राहांगडाले, सचिव नारायणरावजी येळे, विद्यापीठ शिक्षण मंचाचे अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे, सचिव सतीश चाफले, नागार्जुन इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर राहांगडाले, जगत महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एन. वाय. लंजे, ऊपप्राचार्य डाॅ. एस. एच. भैरम, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिशिर कटरे, बबलू कटरे, खेमेंद्र कटरे, भागचंद्र रहांगडाले, महेंद्र बिसेन, पप्पू पटले आदी मित्र मंडळी नी अभिनंदन केले आहे.