कर्मचारी,मजूर,कामगारांच्या लढाईसाठी मजदूर युनियन -जे. एस. पाटील

0
29

गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी अरविंद साखरे यांची निवड
गोंदिया ता.29:-पदोन्नतीतील आरक्षण लागूकरून जुनिपेन्शन मिळावी यासाठी संपूर्ण भारतभर मजूर कामगार कर्मचाऱ्यांच्या हितासाठीची लढाई स्वतंत्र मजदूर युनियन लढाई लढते आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी आज (ता.29) केले.
गोंदियात आयोजित एका सभेला संबोधित करताना श्री पाटील अध्यक्ष पदावरून बोलत होते.
मंचावर महावितरणचे सेवानिवृत्त मुख्यअभियंता बंडूभाऊ वासनिक,कार्यकारी अभियंता वाय. बी. मेश्राम, आणि प्रभारी अधीक्षक अभियंता धम्मदीप फुलझेले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री पाटील यांनी याप्रसंगी मजदूर युनियनची विस्तृत माहिती दिली ते पुढे म्हणाले की,फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञानामुळे तळागाळातील माणसांची समस्या संपूस्टात येऊ शकते असे सांगून सण 10 जुन 1890 मध्ये महात्मा फुल्यांचे सत्यशोधक चळवळीचे शिस्य नारायण मेघा लोखंडे यांनी मजु्रांसाठी प्रथम आंदोलन केलं असून खऱ्या अर्थाने भारतीय मजदूर दिवस याचं दिवसाला म्हणता येईल असा युक्तिवाद त्यांनी केला.
मागासवर्गीयांचे संघटित व असंघटित क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी गोंदिया जिल्हा शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात येवून अध्यक्षपदी गोरेगाव पंचायत समितीचे ग्रामसेवक अरविंद साखरे, उपाध्यक्षपदी अर्जुनी /मोर पंचायत समितीचे ग्रामसेवक पी. वाय.नगराळे,सचिव विस्तार अधिकारी शिक्षण अहिल्याताई खोब्रागडे, सहसचिव शिक्षक संतोष डोंगरे,कोषाध्यक्ष तिरोडा पंचायत समितीचे ग्रामसेवक योगेश्वर डोंगरे,संघटक आमगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल. एन. कुटे,सल्लागार अर्जुनी मोर पंचायत समितीचे ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर आणि सदस्य म्हणून धर्मेंद्र (छोटू )बोरकर, अभय मेश्राम, देवेद्र हत्तीमारे,सुनील बडगे,शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त सुशील गणवीर यांची निवड करण्यात आली आहे.या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.सभेचे संचालन MSEDCL चे डेप्युटी इंजिनिअर अमित पाटील यांनी तर आभार धर्मेंद्र बोरकर यांनी मानले. यावेळी गोंदिया जिल्यातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.