मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाईन सादर करा

0
7

भंडारा, दि.02: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी महाडीबीटी या प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा अर्ज भरण्याकरिता दिनांक 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जांची नोंदणी केलेली नाही. 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी तात्काळ शासनाच्या https://Mahadbt.maharashtra.gov.in  या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करावी.

 संबंधित महाविद्यालयांनी नोंदणीकृत झालेले अनु. जाती, विमाप्र, विजाभज व इमाव प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरी करिता सादर करावे. सदर प्रवर्गाचा एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्ती पासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.