संघी टॉपर्स अवॉर्ड समारोह 4 फेब्रुवारीला

0
18

आमगाव,दि.02ः- गोंदिया येथील संघी परिवारातर्फे आमगाव तालुक्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी संघी टॉपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते.यंदा या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीला 4 फेब्रवारी रोजी भवभूति महाविद्यालयात करण्यात आले आहे.संघी टॉपर्स अवार्डसाठी श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीटयुट ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी नेहा भुवनलाल बिसेन,श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या बी.एड.चा विद्यार्थी शुभम नटवरलाल चौव्हाण, डी.टी.एड.ची विद्यार्थिनी मासूम योगराज राऊत, श्री लक्ष्मणराव मानकर आयटीआयचा शैलेश योगराज कोल्हे, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकची शितल भाकचंद कटरे,
विद्यानिकेतन कनिष्ठ महविद्यालयचा गौरव बम्हानंद वाघमारे, आदर्श विद्यालयची प्रेरणा राजेंद्र बिसेन,अश्विनी सुधिरकुमार बिसेन व भवभूति महाविद्यालयाचा मुकूंद रेखलाल टेंभरे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांचा 4 फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभात संधी टॉपर्स अवार्ड,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे.असे आवाहन भवभूति शिक्षण संस्थेचे सचिव केशवराव मानकर,अध्यक्ष सुरेशबाबु असाटी,लक्ष्मणराव मानकर इन्स्टिटयूटयू ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी यांनी केले आहे.