निशुल्क रोग निदान व रक्तदान शिबिर शनिवारी

0
18

आमगाव-दरवर्षी र्शद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती साजरी केली जाते. त्या निमित्त भवभूती शिक्षण संस्था आमगांव आणि बाहेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ४ फेब्रुवारीला श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी रीसामा येथे निशुल्क रोग निदान तपासणी तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये निशुल्क हृदयरोग, मधुमेह, कान, नाक, घसा, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, हड्डी रोग, कॅन्सर, मेंदू रोग याविषयी तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ. दीपक बाहेकर फिजिशियन अँड कार्डिओलॉजिस्ट, डॉ. अलका बाहेकर स्त्रीरोग व प्रसूती रोग तज्ञ,डॉ गार्गी बाहेकर स्त्रीरोग तज्ञ,डॉ अनुराग बाहेकर इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट,डॉ गौरव अग्रवाल कान नाक घसा सर्जन,डॉ निलेश नागभीरे क्रिटिकल केअर तज्ञ,डॉ जितेंद्र येडे जनरल सर्जन, डॉ सतीश बनसोड आथोर्पेडिक सर्जन,डॉ सौरभ मेर्शाम कॅन्सर स्पेशालिस्ट, डॉ उज्वला मेर्शाम नेत्ररोग स्पेशालिस्ट, डॉ कंचन भोयर फिजिओथेरपीस्ट डॉ अमरीश खाटोड कार्डिओथोरासिस सर्जन, डॉ सनी जयस्वाल न्यूरोसर्जन, डॉ मनीष चोखंद्रे, डॉ. शिवांगी निंबेकर दात व मूक रोग या तज्ञ चिकित्सकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
निशुल्क होणार्‍या या शिबिराचा लाभ परिसरातील जनतेने घ्यावा असे आवाहन भवभूती शिक्षण संस्थेच्या सचिव केशवराव मानकर तथा बाहेकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोंदिया च्या वतीने केले आहे.