आमची शाळा- आदर्श शाळा अंतर्गत खर्रा शाळेला जिल्हास्तरीय तपासणी समितीची भेट

0
16

गोंदिया,दि.17ः आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धेतर्गत गोंदिया तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा येथे जिल्हास्तरीय मूल्यमापनामध्ये जिल्हा मूल्यांकन समितीने भेट दिली.समितीचे नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात, आदिवासी नृत्याच्या माध्यमाने स्वागत केले. त्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या बॅचेसने चमूचे स्वागत करण्यात आले.परिपाठामध्ये विविध उपक्रमांच्या द्वारे विद्यार्थ्यांनी परिपाठाचे सादरीकरण इंग्रजीमध्ये केले.परिपाठातील अतिशय उत्कृष्ट सादरीकरण बघून तपासणी चमूतील सर्व सदस्य भारावून गेले.त्यानंतर लगेच वर्ग तपासणीला सुरुवात करण्यात आली. तपासणी मध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. आदिवासी क्षेत्रातील शाळा ही नावारूपास येण्यासाठी मागील चार वर्षात 83 वरून 130 विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढ करून शाळेने गुणवत्ता वाढीसाठी खूप प्रयत्न केले. मागील चार वर्षात पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 25 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. असे एक ना अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्याचे प्रयत्न येथील शिक्षक करीत आहेत. आमची शाळा आदर्श शाळा या स्पर्धेत गोंदिया तालुक्यातून प्रथम येऊन आज जिल्हा मूल्यांकन समितीने भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला याप्रसंगी जिल्हा मूल्यांकन समितीचे सदस्य डॉ. नरेश वैद्य जेष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया,बाळकृष्ण बिसेन जिल्हा समन्वयक ,समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद गोंदिया,राहुल शेजव प्रकल्प समन्वयक अदानी फाउंडेशन तिरोडा यांनी संपूर्ण शाळेची तपासणी केली. याप्रसंगी रविकुमार पटले माजी सरपंच एकोडी,प्रकाश पटले माजी पंचायत समिती सदस्य गंगाझरी,विकास शेंद्रे सरपंच ग्रामपंचायत खर्रा,मेघराज पटले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खर्रा,संगीता किसाने उपसरपंच खर्रा,अर्चनाताई पालांदुरकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खर्रा आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि गावातील शेकडो पालक उपस्थित होते.