स्वतः चे ध्येय ठरवा,शिवाजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा _आर.वाय.कटरे

0
11

गोरेगाव दि.१९:  स्व. ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.वाय.कटरे होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्य गीत “जय जय महाराष्ट्र माझा ” ने करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गीत गायन केले व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.श्री ए. वाय. टेंभरे, श्री एस.एल.बडोले,श्री के.के.यादव,कू.ओ.बी.ठाकरे यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर. वाय.कटरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात चांगले की स्वतःचे ध्येयगाठा शिवाजी महाराजांच्या कार्याचे निरीक्षण करून त्यांचे गुण अंगी करा व आपलं भविष्य उज्वल करा संचालन हीमांशी फाये वर्ग १०वी व आभार प्रदर्शन कार्तिक पटले वर्ग १०वी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने झाली. या प्रसंगी शाळेतील सर्व,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱी व विद्यार्थी उपस्थित होते.