40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक छ्त्रपती विद्यालय सितेपार येथे निरोप समारंभ संपन्न

छ्त्रपती विद्यालय सितेपार येथे निरोप समारंभ संपन्न

0
68

blank

आमगाव,दि.26ः-तालुक्यातील श्री संत गाडगे महाराज शिक्षणसंस्था सितेपार द्वारा संचालित छ्त्रपती विद्यालय सितेपार या माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना निररोप देण्यात आले. सदर निरोप समारंभाच्या कार्यक़माचे अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सौ.एम.व्ही.चौधरी यांनी भुषविले.प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एम.एस.पटले,मनश्यामजी बिसेन उपाध्यक्ष शा.व्य. समिती,दिगंबरजी बिसेन उपाध्यक्ष शिक्षक पा.संघ,भागवत बिसेन,हिरालाल बिसेन,योगेश्वरीबाई थेर,लताबाई बिसेन,मनिषा पटले शा.व्य.समिती सदस्य इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक आर.एस.जैतवार,इयत्ता नववीचे वर्ग शिक्षक ओ.एम.बोपचे,जे.डी.कटरे,कु.बि.एस.मेश्राम,व्हि.आर बिसेन,मरकाम,कावळे,पटले उपस्थित होते.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी स्वत:चे मनोगत व्यक्त केले.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती एम.व्ही.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक़माचे संचालन कु .अस्मिता रिनाईत यानी केले. प्रास्ताविक ओम.एम.बोपचे यांनी तर आभार जागृती हरिणखेडे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

blank