प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागात वार्षिक स्नेहसंमेलन

0
14
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्त्व विभागात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी ह्या होत्या. स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या स्नेहसंमेलनाला विभाग प्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी, डॉ. प्रभास साहू, डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, डॉ. एकता धारकर, डॉ. मोहन पारधी, शैला भक्ते, बिपिन बनसोड, चेतना वढावे, पवन हरडे, तन्मय हवालदार आदी उपस्थित होते. विभागात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. हेराफेरी चित्रपटा मधील एक दृश्य, नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, त्याचप्रमाणे झाडीपट्टीतील नाटक, गरबा नृत्य आदी विविध प्रस्तुती करण्यात आली. ‘दिलमेश’चे महाकाव्य सुरज बारमते, प्रमोद समर्थ, नवीन व ईशा यांनी सादर केले. शैला भक्ते व मोहन पारधी यांनी कविता सादर केल्या. प्रमोद समर्थ व चेतना वाढावे यांनी एकल नाटक सादर केले.
‘अभिज्ञान शाकुंतलम’ हे नाटक बुलबुल अग्रवाल, अभिषेक साठवणे, समीर खान, आशुतोष बनसोड, प्रखर गुप्ता, ईशा चौधरी, तेजस्विनी सोनूकुसरे, डॉ. एकता धारकर, प्रमोद समर्थ, सुरज बारमते यांनी सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन चेतना वाढावे यांनी केले तर बिपिन बनसोड यांनी संगीत दिले. प्राची मानकुंबरे यांनी पोवाडा सादर केला. पवन हरडे व अभिषेक पाटील यांनी खली बली आणि मल्हारी नृत्य सादर केले. बुलबुल अग्रवाल आणि अभिषेक पाटील यांनी नृत्य सादर केले. समीर खान व अभिषेक पाटील यांनी साउथ इंडियन रिमिक्सवर नृत्य केले. समीर खान, बुलबुल अग्रवाल व अभिषेक पाटील यांनी संयुक्त नृत्य केले. हेराफेरी मधील पात्र अमिषा, प्राची मनकुंबरे, नवीन, अभिषेक पाटील, चिन्मय मिश्रा, प्रखर गुप्ता, प्रमोद समर्थ, समीर खान यांनी प्रस्तुत केले. ईशा चौधरी, समीर खान, अभिषेक पाटील, अभिषेक साठवणे, बुलबुल अग्रवाल, डॉ. प्रभास साहू, एकता धारकर, चेतना वढावे, बिपिन बनसोड, पवन हरडे, नेहा, निकिता, पल्लवी, तन्मय हवालदार, अमिषा, प्रमोद समर्थ, सुरज बारमते, आशुतोष बनसोड, प्रखर गुप्ता, चिन्मय मिश्रा, तेजस्विनी सोनकुसरे, गायत्री डोहतारे, आशिष, नवीन, प्राची मनकुंबरे यांनी विविध वेशभूषा सादर केल्या. कार्यक्रमाचे संचालन ईशा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.