देवरीतील जिल्हा परिषद हायस्कूलचे विशेष उपक्रम

0
15

देवरी,दि.२६-स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व गट साधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वर्ग 5 वी नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षा २०२३ च्या पहिल्या सराव परीक्षेचे आयोजन आज (दि.२६) रविवारी करण्यात आले होते.

बाबुराव मडावी विद्यालय देवरी येथे आयोजित सदर परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. आज घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ८० परीक्षार्थ्यांपैकी ७७ परीक्षार्थींनी उपस्थिती नोंदवून परीक्षा दिली.

सदर परीक्षेच्या यशस्वितेसाठी एस जी राऊत केंद्रप्रमुख ककोडी, एम जी गेडाम सहाय्यक शिक्षक भर्रेगाव, हिरालाल सोनवणे सहाय्यक शिक्षक गोठणपार यांनी सहकार्य केले.
संचालन डी टी कावळे गट समन्वयक, एम के सयाम मुख्याध्यापक, ए एस वाघदेवे सहाय्यक शिक्षक यांनी केले मार्गदर्शन देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला.