40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News गोंदियात जुन्या पेंशनच्या समर्थनात लागले नक्षल्यांचे बॅनर

गोंदियात जुन्या पेंशनच्या समर्थनात लागले नक्षल्यांचे बॅनर

0
498

blank

गोंदिया,दि.26ः-गेल्या आठवड्यात जुन्या पेंशनला घेऊन राज्यसरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाने आंदोलन करुन सरकारला जेरीस आणले होते.मात्र संघटनाच्या समन्वय समितीने संप मागे घेतल्याने जुन्या पेंशनचा प्रश्न तसाच कायम राहिलेला असताना आज रविवारला (दि.26)जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावर सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे जुन्या पेंशनला समर्थन असल्याचे बॅनर आढळून आले.यात नवीन पेंशन योजना रद्द करण्यात यावे,ठेकेदारीकरण बंद करण्यात यावे.मेस्मा कायदा लागू करणार्या शिंदे फडणवीस सरकारचा मुर्दाबाद अशा अनेक घोषणा बॅनरमध्ये लिहिलेल्या आहेत.सोबतच काढलेले पत्रक हे महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड झोनल(माओवादी)कमेटीचे प्रवक्ता अनंत यांच्या नावे आहे.

blank