मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

0
13

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मध्ये पालक शिक्षक सभा 28 मार्चला पार पडली. अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रा. आर. डी. कटरे तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम,पर्यवेक्षक कु.एस.डी.चीचामे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लोकेश डी. कटरे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. सभेत शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले यांनी शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये राबविण्यात येणार्‍या शैक्षणिक योजनेची जाणीव करून पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक अडचणी यावर पालक सभेत चर्चा करण्यात आली. तसेच सभा अध्यक्ष आर.डी.कटरे यांनी पालकांकडून आलेल्या सुचना त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्य सौ सी. पी. मेश्राम यांनी प्रलंबित असलेल्या शैक्षणिक शुल्कबद्दल त्याचबरोबर शैक्षणिक अडचणीवर मार्गदर्शन केले.तसेच लोकेश डी. कटरे उपाध्यक्ष पा.शि.संघ यांनी संस्था, शिक्षक व पालक यांच्यात प्रेमाचे जुळवून ठेवल्याने आपल्याला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मध्ये वाढ करता येते यावर मार्गदर्शन केले. उपरोक्त सभेत पालक शिक्षक सभा गठीत करण्यात आली. त्यामधे शैक्षणिक सत्र 2022-23 मधील पालक शिक्षक संघ पूर्ववत ठेऊन लोकेश कटरे यांची सर्वानुमते पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन स. शि.आर.बी.कोल्हे यांनी तर आभार आर.एम.कटरे यांनी मानले.