राजर्षी छत्रपती शाहू महाराज शताब्दी वर्ष निबंध स्पर्धेत दवडीपार शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

0
27

गोरेगाव,दि.31ः- राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे अंतर्गत सत्र २०२२-२३ या वर्षात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून आयोजित केलेल्या तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत दवडीपार शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटात जि.प.कें.व.प्राथ.शाळा दवडीपार येथील कु.युक्ती सुभाष मेश्राम (वर्ग ६)तालुक्यात द्वितीय,कु.विधी सुभाष मेश्राम (वर्ग ३) व  कु.स्विटी योगेश्वर कटरे(वर्ग ३) यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.