23.9 C
Gondiā
Thursday, September 17, 2026
Home शैक्षणिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शताब्दी वर्ष निबंध स्पर्धेत दवडीपार शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शताब्दी वर्ष निबंध स्पर्धेत दवडीपार शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

0
80

गोरेगाव,दि.31ः- राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे अंतर्गत सत्र २०२२-२३ या वर्षात छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून आयोजित केलेल्या तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत दवडीपार शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटात जि.प.कें.व.प्राथ.शाळा दवडीपार येथील कु.युक्ती सुभाष मेश्राम (वर्ग ६)तालुक्यात द्वितीय,कु.विधी सुभाष मेश्राम (वर्ग ३) व  कु.स्विटी योगेश्वर कटरे(वर्ग ३) यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.