cbse 10 वीच्या परीक्षेत गोंदिया पब्लीक शाळेतून खिलेश कडव प्रथम

0
25

गोंदिया,दि.13ः- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने नुकताच दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला. निकालात गोंदिया पब्लीक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून शाळेतील खिलेश कृष्णराव कडव याने ९५.४ टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळा प्रशासनाकडून त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या वतीने दहावीचा निकाल काल (ता.१२) जाहिर करण्यात आला. या निकालात गोंदिया जिल्हृयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत यश संपादन केले. निकालात गोंदिया पब्लीक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतील खिलेश कृष्णराव कडव याने ९५.४ टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. खिलेशच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने व्यवस्थापक इंदिरा सपाटे, प्राचार्य जितेंद्र तलरेजा, श्रीमती गौर, वाढई, पारधी, मिनाक्षी, झा, कुथे, प्रभा राव आदि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. खिलेश कडव याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांसह आजी शांताबाई कडव, वडिल कृष्णराव कडव, आई संगीता कडव, गुणवंत कडव, भास्कर कडव, ज्योती कडव, अनिता कडव, घनश्याम हलमारे, प्रतिभा हलमारे आदिंना दिले आहे.