मॉडेल कॉन्वेंटच्या विद्यार्थ्याची गरुड झेप इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद

0
22

गोरेगांव :- स्थानिय कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील नर्सरीतिल विद्यार्थी अनूदिप अंकुश चव्हाण याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नामांकन प्राप्त केले आहे. अनूदिप हा नर्सरी मध्ये शिकत असून फक्त 3 वर्ष 6 महिन्याचा आहे. 200 जनरल नॉलेज, देशपातळीवर अनेक प्रश्न तोंडपाठ आहेत, तसेच 1 ते 100 पर्यंत गिनती तोंडपाठ आहे. अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेची दखल घेत इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड ने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याचा सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या आई वडील तसेच मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव करिता खूप गौरवास्पद बाब आहे. शाळेतील संस्था संचालक श्री आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी श्री सी. बी. पटले, प्राचार्य सौ सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे वर्गशिक्षक सौ आर. बी. पटले, लिपिक श्री आर. बी. कांबळे, शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.