एक्यूट पब्लिक शा‌ळेचे १०० टक्के निकालाची परंपरा कायम

0
14

गोंदिया,दि.26- मागील अनेक वर्षापासुन एक्यूट पब्लिक शा‌ळेचा निकाल सतत १०० टक्के लागत आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या बारावीचा निकालाची परंपरा कायम ठेवात ऊंच भरारी घेतली. शाळेच्या निकाल १०० टक्के लागला असुन शाळेतुन वाणिज्य शाखेत प्रज्जवल लिल्हारे या विद्यार्थ्यांने ९१.१७ टक्के गुण प्राप्त करुन शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच हार्दिक पाचे या विद्यार्थ्यांने ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय आणि यांशु धुर्वे या विद्यार्थ्यांने ८०.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच ह्या शाळेच्या विज्ञान शाखेतुन हरीश पगरवार या विद्यार्थ्यांने ८५.१७ टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच धनश्री पारधी या विद्यार्थ्यांने द्वितीय, दिव्या उमारकर ८२.८३ आणि श्रद्धा चंद्रवंशी ८२.८३ या दोन्ही विद्यार्थ्यांनीने तृतिय क्रमांक प्राप्त केले.
एक्यूट पब्लिक शळेचा शैक्षणिक दर्जा सातत्याने ऊंचावित आहे. त्यामुळे विद्यार्थी ही ऊंच भरारी घेऊन उच्च शिक्षणासाठी झेप घेत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  गीताताई भास्कर, सचिव संजय भास्कर, सह सचिव श्रीमती शुभा शाहारे तसेच शळेचे प्राचार्य व सर्व शिक्षकगण आणि आई-वडिलांन दिले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.