नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के,गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के

0
14

मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे प्रमाण 87.63 टक्के

गोंदिया दि.26-  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 87.63 टक्के आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के लागला आहे. गोंदिया जिल्ह्यात वाणिज्य शाखेत पर्व अग्रवाल 97.33 टक्के,विज्ञान शाखेत आयुष डोंगरे 95.17 टक्के प्रथम आला आहे. जिल्ह्यात वाणिज्य शाखेचा 90.82 टक्के, विज्ञान शाखेचा 98.94 टक्के व कला शाखेचा 86.05 टक्के निकाल लागला.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर झाला. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व  निकालाची टक्केवारी 91.25 टक्के आहे.

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागातील या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील एकूण 1 लाख 52 हजार 121 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी 1 लाख 37 हजार 455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व  निकालाची टक्केवारी 90.35 टक्के आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी  उत्तीर्णांमध्ये 67 हजार 442 मुले तर 70 हजार 6 मुली आहेत. यानुसार मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 87.63 टक्के आहे.

नागपूर विभागातील  सहा जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के लागला आहे. यात 95.64 टक्के मुली तर 91.32 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गडचिरोली  जिल्ह्याचा निकाल 92.72 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.70 टक्के तर मुलांचे प्रमाण 90.83 टक्के आहे. भंडारा  जिल्ह्याचा निकाल 92.19 टक्के लागला आहे. यात 95.50 टक्के मुली तर 89.16 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल 90.69 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.39  टक्के तर मुलांचे प्रमाण 88.03 टक्के आहे. नागपूर जिल्ह्याचा निकाल 89.81 टक्के लागला आहे. यात 92.41 टक्के मुली तर 87.21 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. वर्धा जिल्ह्याचा निकाल 84.51 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 89.04  टक्के तर मुलांचे प्रमाण 80.11 टक्के असल्याचे नागपूर विभागीय मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

नागपूर विभागात 6 हजार 748 विद्यार्थी प्राविण्याने  (75 टक्के पेक्षा जास्त गुण)  उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत (60 ते 74 टक्के गुण)  उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 32 हजार 454 आहेत. द्वितीय श्रेणीत 71 हजार 359 विद्यार्थी (45 ते 59 टक्के गुण) तर तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 26 हजार 894 आहेत.

आजच्या निकालात नऊ विभागीय मंडळाच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल 91.25 टक्के तर पुर्नपरिक्षार्थींचा एकूण निकाल 44.33 टक्के लागला आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 82.39 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा 96.09 टक्के, कला शाखेचा 84.05 टक्के, वाणिज्य शाखेचा 90.42 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा 89.25 टक्के तर आयटीआय शाखेचा 90.84 टक्के निकाल लागला आहे.

श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालीत कमलाकरराव केसवराव इंगले ज्युनिअर कॉलेज (कॉमर्स,विज्ञान) सिविल लाइन्स, गोंदिया येथील इयत्ता.12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागलेला आहे आणि कॉमर्स शाखेचा निकल 95% आहे तसेच रामचंद्र सुरेंद्रराज डोये ज्युनिअर कॉलेज (कला,विज्ञान) खमारी. चा इयात्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100% लागलेला आहे व आर्ट चा निकल 93% लगला आहे।

श्री कमलाकरराव केशवराव इंगले ज्युनिअर कॉलेज (विज्ञान, कॉमर्स) गोंदिया इयत्ता12 वी विज्ञान शाखा
एकूण प्रविष्ट—-109
एकूण उतिर्ण—109
एकूण विशेष प्राविण्य श्रेणीत— 09
एकूण प्रथम श्रेणीत— 66
एकूण द्वितीय श्रेणीत— 29

इयत्ता 12 वी कॉमर्स शाखेच्या निकालाचे विश्लेषण
एकूण प्रविष्ट—- 43
एकूण उतिर्ण— 41
एकूण प्रथम श्रेणीत—–02
एकूण द्वितीय श्रेणीत—21

श्री रामचंद्र सुरेंद्रराज डोये ज्युनिअर कॉलेज (कला,विज्ञान) खमारी. इयात्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100%
अर्थात या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा सतत जोपासलेली आहे हे विशेष.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नागपूर विभाग नागपूर च्या वतिने फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित इ.12 वी (कला) च्या परीक्षेत 60 पैकी 56 विद्यार्थी उत्तिर्ण, अर्थात निकालाची टक्केवारी 93% व इ.12 वी विज्ञान (माहीती तंत्रज्ञान) च्या परीक्षेत 126 पैकी 126 विद्यार्थी उतिर्ण झालेले असल्यामुळे, निकालाची टक्केवारी 100%.

इयत्ता.12 वी कला शाखा एकूण प्रविष्ट—-60
एकूण उतिर्ण—56
एकूण प्रथम श्रेणीत—–05
एकूण द्वितीय श्रेणीत—38
एकूण तृतिय श्रेणीत—-13

इ.12 वी विज्ञान शाखा एकूण प्रविष्ट—-126
एकूण उतिर्ण—126
एकूण विशेष प्राविण्य श्रेणीत—-01
एकूण प्रथम श्रेणीत—–49
एकूण द्वितीय श्रेणीत—71
एकूण तृतिय श्रेणीत—-05

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया चे अध्यक्ष एड. रामचंद्र डोये, उपाध्यक्ष अजय इंगळे, सचिव अमृत इंगळे, तसेच कमलाकरराव केशवराव इंगले ज्युनिअर कॉलेज (विज्ञान, कॉमर्स) गोंदियाचे प्राचार्य माया अमृत इंगले, तसेच रामचंद्र सुरेंद्रराज डोये ज्युनिअर कॉलेज खमारीचे प्रिंसिपल सुजीत रंगारी, व नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक वाय पी बोरकर, सुपरवाइजर जी आर कपगते, श्रीराम विद्यालयचे मुख्याध्यापक विनोद रावते, तथा साइंस, कॉमर्स, आर्ट, ज्युनिअर कॉलेज गोंदिया व खमारी चे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.