Home शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले

गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले

0

स/अर्जूनी (27 मे)-गुणात्मक दर्जा वाढवून ते कायम ठेवने ही तारेवरची कसरत आहे.या साठी कठोर परिश्रम करणे अनिवार्य असते.त्याप्रमाणे,गुणवंत विद्यार्थ्यांना,स्वतःची गुणवत्ता या पूढेही कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम करणे गरजेचे असते असे प्रतिपादन जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले यांनी केले.
श्री.पटले आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरीच्या वतिने ता.27 मे,शनिवारी आयोजित इ.12 वी च्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या प्रसंगी उद्घाटन स/अर्जुनी पंचायत समीतीचे उपसभापती शालींद्र कापगते यांनी केले .विचारमंचावर,प॔ स सदस्य चेतन वडगाये,खजरी ग्रामपंचायतचे सरपंच महेश गहाणे ,जगत नारायण ब्रिलियंट अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक तथा से.नि.प्राचार्य खुशाल कटरे,प्राचार्य रविशंकर कटरे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य आर.के.कटरे यांनी केले.या प्रसंगी श्री.वडगाये म्हणाले की विद्यालयाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी भयमुक्त, तणाव मुक्त व आपुलकीचे,आनंदी वातावरण विद्यालयात असने गरजेचे असते.उद्घाटक श्री.कापगते यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुर्व तयारीस्तव, शाळेत अकॅडमी स्थापण करने, हा स्वागतार्ह उपक्रम आहे.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे अंतर्गत नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतिने मार्च 2023 मध्ये आयोजित इ.12 वी मध्ये गुणानुक्रमे अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह सत्काराप्रित्यर्थ निमंत्रित करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांनी ,इ.12 वी कला चे 11 व इ.12 वी विज्ञान चे 11 गुणवंताचा सत्कार करून ,त्यांचे कौतुक करीत आशिर्वाद दिला.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुरज रामटेके व प्रा.संजय येळे यांनी संयुक्तपणे केले.व आभार प्रा.कु.सी.बी.टेंभरे यांनी मानले.

Exit mobile version