स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कुलचा निकाल 100 टक्के

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव,दि.03- तालुक्यातील स्वर्गीय ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी शाळेचा एसएससी मार्च 2023 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून अन्यना अनिल मेश्राम हिने 92.80 टक्के गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.परिक्षेकरीता 34 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी  33 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.प्राविण्यश्रेणीत 19, प्रथम श्रेणी 10,व्दितीय श्रेणी 05 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयातून द्वितीय क्रमांक कु.मयुरी काशीराम डोहळे  हिने 89.60℅ ,तृतीय क्रमांक कु. रोहिणी कृष्णकुमार बिजेवार 89.20℅,चतुर्थ क्रमांक अश्विनी रंगलाल बिसेन 89.00℅
पाचवा क्रमांक काजल लक्ष्मीचं डोहळे 88.60%,सहावा क्रमांक कार्तिक जितेंद्र पटले 88.00%,सातवा क्रमांक तन्वी कैलास बांगरे 87.00%,आठवा क्रमांक हिमांसी वसंतराव फाये 86.40%,नववा क्रमांक करिष्मा सुरेश ठाकरे 86.00% हिने पटकावला.प्राविण्य,प्रथम व द्वितीय श्रेणीत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक,शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.