एक्यूट पब्लिक शाळेत ” शिक्षक दिवस ” हर्षोल्हासात साजरा

0
12

गोंदिया,दि.05– येथील एक्यूट पब्लिक शाळेत शिक्षक दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.आदर्श शिक्षक, राजनीतिज्ञ, देशाचे उपराष्ट्रपति आणि राष्ट्रपती पद भूषणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांति ज्योति सावित्रीबाई यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी वैदिक शिक्षण, गुरुकुल शिक्षण व आधुनिक शिक्षण प्रणाली यांचे उदात्व दर्शन घडवण्यात आले. विद्यार्थ्यांनी ऋषिमुनी, गुरुमाता व आधुनिक शिक्षकाचे वेग धारण करून आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली. शिक्षकांनी विद्यार्थ्याची गणवेश घालून आदर्श शिष्याची भूमिका पार पाडली. वैदिक शिक्षणात संपूर्ण परिसर आनंदमयी झाले. विविध प्राण्यांची पक्ष्यांची वेशभूषा धारण केली. भाषणे गीते सादर करण्यात आली. वैदिक शिक्षण, यज्ञ आहूति, तलवारबाजी आणि धनुरविद्या शिक्षण दिले.या प्रसंगी “संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे” सचिव संजय भास्कर, सह सचिव श्रीमती एस. शुभा, शळेचे मुख्याध्यापक श्रीमती उज्जवला आणि कापगते सर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षणकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संबोधून भविष्यात आदर्श नागरिकत्वाचे पालन करता यावे म्हणून आशीर्वाद दिले व शिक्षका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.