गोंदिया- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी येथे शिक्षक दिवस कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी रविकुमार (बंटी) पटले सदस्या जिल्हा परिषद गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष अरूनकुमार बिसेन , सदस्य राजेशकुमार तायवाडे पत्रकार, महेंद्र कनोजे, अनंदा लिल्हारे, निरोशा अलचेवार व शारदा बिसेन तसेच पालकवर्ग उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिति सदस्यांकडून शालेय गुरूजनांचा पुष्पगुच्छ देउन स्वागत व सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले यांनी गुरुची महत्ता सांगितली. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनुन स्वयं शासन अंतर्गत अध्यापन कार्य केले.प्रास्ताविक एन.जी.डहाके उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,संचालन कु.एस.एम.चव्हाण सहायक शिक्षक व आभार एम.आर उईके सहायक शिक्षक यांनी मानले.