राज्यसरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने महेंद्र सोनेवाने सन्मानित

0
8

गोंंदिया,दि.08– समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील माध्यमिक विभागातून महेंद्र भुवराज सोनेवाने, सहाय्यक शिक्षक, शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव यांना हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला.
पुरस्कार वितरण कार्यक्रम टाटा थिएटर, नरीमन पाॅईंट मुंबई येथील सभागृहात शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अध्यक्ष,शिक्षणमंत्री दिपक केसरकर,मंत्री मंगल प्रभात लोढा,शिक्षक आमदार कपील पाटील,विक्रम काळे (शिक्षक आमदार) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. देण्यात आले.

महेन्द्र भुवराज सोनेवाने यांना राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षणाधिकारी (प्राथ.) महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्य.) कादर शेख,प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे,मुख्याध्यापिका सौ.यशोधरा सोनेवाने ,जयंत मुरकुटे, रतिराम भांडारकर, दिपेश सोनेवाने, गोकुल परदेशी, मोहन मरकाम, दिलीप रहांगडाले, माधुरी गजबे, वशिष्ठ खोब्रागडे, स्नेहल तिडके, भुमेश्वरी मुरकुटे, श्रृती सोनेवाने, प्रतिक तिडके, डॉ.मंगेष सोनेवाने, मनोज सोनेवाने, कविता लिचडे, डॉ.यु.एल.यादव, सुभाष मारवाडे, महेंद्र बघेले, वैशाली चौधरी, नंदा गजभिये, अनुश्री गोतमारे, मोरेश्वर पटले, शत्रुघ्न चापले, सावन कटरे तसेच सर्व मित्र मंडळीनी अभिनंदन केले.