‘तो’ तर आम. कोरोटे यांना बदनाम करण्याचा राजकीय स्टंट!

0
16

पांढरवाणी उपसा सिंचनमुळे २४३ कास्तकारांना लाभ
रबीत ९०हेक्टरवर उत्पादन.

देवरी ता.०८: सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी या गावात उपसा सिंचन योजना सुरू झाली. त्यामुळे २४३ शेतकऱ्यांच्या २८३ हेक्टर शेताला सिंचन मिळणार आहे. २०२२ च्या रबी हंगामात ९० हेक्टर क्षेत्रात पीक घेण्यात आले. या योजनेचे लाभार्थी शेतकरी आनंदी आहेत. नेमकी हीच बाब या योजनेचे लाभार्थी नसलेल्या व्यक्तींना पचनी पडली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आमदार सहषराम कोरोटे यांच्या विरोधात त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून राजकीय स्टंट घडवून आणल्याची चर्चा परिसरात आहे.

१९९२ ते १९९४ ला सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी येथील उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. ७४.३४. लक्ष या मूळ किमतीच्या अंदाजपत्रकानुसार योजनेचे काम सुरू झाले. काम लांबणीवर गेल्यामुळे २ कोटी ४४ लक्ष ६७ हजार रुपयांच्या सुधारीत अंदाजपत्रकाला पुन्हा मंजुरी दिली. या योजनेसाठी ४.५६ हेक्टर खासगी आणि ०५६हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित केली. तसेच०३६ हेक्टर वनजमिनीची पुन्हा आवश्यकता असून त्यासंदर्भातील प्रक्रियाही पूर्ण केली आहे. १९९४-१५ दरम्यान मध्यम पाटबंधारे विभागांतर्गत २४१.३३ लाख रुपयांचा निधी या योजनेवर खर्च करण्यात आला. आ. सहसराम कोरेटे यांच्या पुढाकाराने या योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले. योजनेच्या माध्यमातून २४३ शेतकऱ्यांची २८३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आनंदात आहेत. योजनेचे लोकार्पण ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. मात्र, जे लोक एका विशिष्ट राजकीय पक्षाचे आहेत, त्यांना ही बाब आवडली नसल्याने आणि ते या योजनेचे लाभार्थी नसताना देखील त्यांनी राजकीय स्टंट केला. त्या स्टंटबाजांवर पांढरवानी येथीलच शेतकरी नाराज असल्याचे बोलले जात आहे