गोंदिया, दि. 13 : निसर्गामध्ये अनेक रहस्य लपलेली असते निसर्गामधूनच विज्ञान शोधाची प्रेरणा मिळते आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्याने त्याला निसर्गात घडणाऱ्या गोष्टीचे कुतूहल वाटून त्यातून नवीन शोध लागू शकतात त्यामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण व्हावी याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय, एकलव्य व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन गटांमध्ये प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे व शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य मेळाव्याचे आयोजन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कडीकसा तालुका देवरी येथे करण्यात आले होते.
या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक बनकर अपर पोलिस अधिक्षक देवरी व विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी देवरी यांनी केले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनेवाने, शिक्षण विस्तार अधिकारी देशमुख व मुख्याध्यापक भोयर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनबोधजी कूमरे उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक गटातील मॉडेल चे परीक्षण कु. भूरे व सौ परिहार यांनी केले. तर माध्यमिक गटातील मॉडेल चे परीक्षण वाडीभस्मे, मोहुर्ले, तांडेकर व सौ कळंबे यांनी केले तर उच्च प्राथमिक गटातील मॉडेलचे परीक्षण कु. सालवणकर, सौ खोंडे, खुणे व लंजे यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात सहा. प्रकल्प अधिकारी सोनेवाने, विषय मित्र दीपेश मांडे, मुख्याध्यापक भोयर, अधीक्षक मेश्राम, शिक्षक साठवणे, राऊत व मेश्राम यांनी केले.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थी
उच्च प्राथमिक गट:- कु. चांदणी ईश्वर सेवता, प्रथम शासकीय आश्रम शाळा बीजेपार, कु. उर्वशी संतोष टेकाम, द्वितीय अनुदानित आश्रम शाळा काटी वकु. तनिषा आल्हा गावडे तृतीय शासकीय आश्रम शाळा कडीकसा
माध्यमिक गट:- कु. दिशा सोनवाने प्रथम अनुदानित आश्रम शाळा कामठा, अमित प्रकाश भुरकुडे द्वितीय अनुदानित आश्रम शाळा पिपरिया व कु प्रणिता राठी तृतीय शासकीय आश्रम शाळा पुराडा
उच्च माध्यमिक गट:- ऋषभ विनोद कुंजाम प्रथम शासकीय आश्रम शाळा पुराडा, निखिल भानुदास तुंमडाम द्वितीय अनुदानित आश्रम शाळा देवलगाव व कु. खुशी रमेश वाढीवे तृतीय शासकीय आश्रम शाळा जमाकुडो
शैक्षणिक साहित्य मेळाव्यातील प्राविण्य प्राप्त शिक्षक:- कु. संगीता पतिराम खोब्रागडे प्रथम, कु. कामेश्वरी जोगीलाल बघवा द्वितीय व कु. संगीता रघुनाथ चुटे तृतीय
प्रकल्प अधिकारी प्रतिक्रिया.
भारताने नुकतेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून विश्वविक्रम केला याचाच धागा पकडून आश्रम शाळेमधून सुद्धा भावी वैज्ञानिक तयार व्हावे विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलचे कुतूहल निर्माण होऊन संशोधनाबद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम असे मॉडेल तयार केले त्याबद्दल मी त्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकाचे अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना विज्ञानात आवड निर्माण व्हावी यासाठी पुढील महिन्यात या प्रकल्पातील 50 विद्यार्थी इस्रोला सुद्धा भेट देणार आहे.