केंद्र आणि राज्यातील जुलमी शासनव्यवस्थेला उलथून टाका

0
8

■ कांग्रेस आमदार कोरोटे यांचा भाजप सरकार विरूध्द हल्लाबोल
■ देवरी तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेचा समारोप 

देवरी,दि.१३: इंग्रजांच्या राजवटीत हुतात्म्यांनी प्राणांची आहुती देवून देशाला स्वातंत्र मिळवून दिले. हुमात्माच्या लढ्यात काँग्रेस पक्ष सहभागी होता. मात्र, गेल्या नऊ वर्षांपासून या देशातील नागरिकांना पुन्हा पारतंत्र्याच्या राजवटीची अनुभूती येवू लागली आहे. पंतप्रधान मोदी व राज्यातील ईडी शासन यांच्याकडून या देशातील सर्वसामान्यांवर जुलूम आणि हुकूमशाही लादली जात आहे. या जुलमी सरकारच्या व्यवस्थेला उलथलवून टाका, असे आवाहन आमदार सहसराम कोरोटे यांनी देवरी येथे जनसंवाद पदयात्रेच्या समारोप प्रसंगी केले.

देवरी तालुक्यात ३ सप्टेबर पासून हरदोली येथून शुभारंभ झालेल्या या जनसंवाद पदयात्रेने संपूर्ण तालुक्यात एकूण २५० कि.मी. मार्गक्रमण केले. दरम्यान या यात्रेत ग्रामीण भागासह शहरी भागातील जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या दारी पोचून केन्द्रातील मोदी व राज्यातील ईडी सरकाराच्या विरोधी कारभारा विषयी संवाद साधला. या यात्रेचे देवरी येथील गोंडविरांगणा महाराणी दुर्गा चौकात मंगळवारी (दि.१२) रोजी दुपारी समारोप करण्यात आले. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.

पुढे आमदार कोरोटे म्हणाले की भाजपच्या जुलूमी आणि हुकूमशाही सरकारला उलथवून काढण्याची शक्ती जनतेत आहे. ९ वर्षापूर्वी सर्वसामान्य नागारिकांना भुलथाप देवून सरकारमध्ये आल्यानंतर याच भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांवर  सुड उगविणे सुरू केले. आज महागाई नियंत्रणाबाहेर आहे. काँग्रेसच्या काळात ३५० ते ४०० रूपयात मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर आज  १२०० रूपयापर्यंत पोहोचला आहे. किंमतीमध्ये ८०० रूपयाची वाढ केली आणि  आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन नाममात्र २०० रुपए कमी करीत जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे महापाप केले. असे असताना पंतप्रधान मोदी बहिणींना राखीची भेट सांगून खोटारडेपणाचा परिचय देत आहेत. या देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्था मोडकडीस आली आहे. मणिपूर राज्यासह महाराष्ट्रात देखील मोदी सरकार जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करीत आहे.
महाराष्ट्र सरकारही जातीव्देषाला हत्यार बनवून राज्यात हिंसाचार पसरविण्याचे काम करीत आहे. जाती-जातीमध्ये वाद निर्माण करीत आहे. देशात नोटबंदीच्या माध्यमातून अदाणी व अंबानी सारख्या उद्योगपतींना सहकार्य करण्याचे काम प्रामुख्याने केले जात आहे.या सरकाराला आता उलथवून काढण्याची वेळ आली आहे. या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेणे आणि जुलमी व हुकूमी सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांना धीर देण्याचे काम आम्ही करीत आहोत.
सर्वप्रथम देवरीच्या धुकेश्वरी माता मंदिर येथून ही जन संवाद पदयात्रा आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात निघून बाजार लाईन, दुर्गा चौक, पंचशील चौक, मस्कऱ्या चौक मार्गक्रमण करीत पुढे बौध्द विहारात माल्यार्पण करून महाराणी दुर्गावती चौक येथे पोहोचली. महाराणी दुर्गावतीला माल्यार्पण करून या यात्रे रूपांतर सभेत करण्यात आले.
याप्रसंगी या यात्रेमध्ये सहभागी  देवरी तालुका महिला अध्यक्ष सुनंदा बहेकार,माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडिया,देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, देवरी शहर महिलाध्यक्ष मीना राऊत,जि.प.सदस्य धरमगुडे, पं.स.सदस्य अनुसया सलामे,प्रल्हाद सलामे,रंजित कासम, नगरपंचायतचे गटनेते सरबजितसिंग भाटिया, नगरसेवक मोहन डोंगरे, शकिल कुरेशी, ओंकार शाहू, युवा विधानसभाध्यक्ष दीपक कोरोटे, आदिवासी कांग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष सोनू नेताम, जिल्हाध्यक्ष भुवन नरवरे, बळीराम कोटवार, कुलदीप गुप्ता,अविनाश टेंभरे, प्रशांत कोटांगले, रोशन भाटिया, ओमराज बहेकार, रामेश्वर बहेकार, नूतन बन्सोड, अमित तरजुले,शार्दूल संगिडवार, मुकुंद बागडे, चिंतामण गंगबोईर, ब्रम्हाजी अरकरा,संपत शिवणकर, रुपेश राऊत, उमेश धानगाये, सुषमा वैद्य, किरण राऊत, सुषमा राऊत, अणवंता आचले, छाया मडावी, मनीषा डुंबरे यांच्यासह देवरी तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि देवरी शहरवाशी  मोठया संख्येने सहभागी झाले होते.