शिक्षक संघाचा शिक्षक गौरव सोहळा ६० शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

0
6

अर्जुनी मोर. :– महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अर्जुनी मोरगावच्या वतीने शिक्षक दिनाच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षक व नवोदय प्रवेश पात्र/प्रवेशित शिक्षक पाल्य व पालक, उल्लेखनीय शैक्षणिक/ सामाजिक कार्यरत शिक्षकवृंद, तालुक्यात बदलीने नव्याने रुजू शिक्षक वृंद यांचा गौरव सोहळा बाजार समिती सभागृह अर्जुनी मोरगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती मा. यशवंत गणवीर हे होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पं.स.सभापती सौ सविताताई कोडापे यांनी भूषवले.दीपप्रज्वलन होमराज पुस्तोडे उपसभापती पंचायत समिती अर्जुनी यांनी केले.तालुक्यातील सर्व जि प सदस्य/ सदस्या व पंचायत समिती सदस्य/ सदस्या आणि प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भूषवले.
यावेळी तालुक्यातील २३ सेवानिवृत्त शिक्षक,१८ तालुक्यात बदलीने नव्याने आलेले शिक्षक, १० नवोदय प्रवेश पात्र/ प्रवेशित शिक्षक पाल्य, उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव क्र.१, उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी/रय्यत शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.यावेळी शिक्षक संघाकडून सुमारे 60 शिक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले. तर आभार सरचिटणीस किशोर लंजे यांनी मानले व सूत्रसंचालन कीर्तीवर्धन मेश्राम व चंद्रशेखर गभने यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन रामटेके, अरविंद नाकाडे, भुवन औरासे, रमेश संग्रामे, शालिक गावळ, प्रशांत चव्हाण, अरुण फाये, मोरेश्वर राऊत, अमोल चौरे, नरेश प्रधान,राजेश मरगडे, पवन कोहळे,दीपक मिस्त्री, सुनंदा कांबळे, संगीता नवखरे, संध्या मते, किरण मानापुरे, सरिता घोरमारे,सदानंद मेंढे, राजेश साखरे, युवराज खोब्रागडे,रवींद्र वालोदे , गुणवंत पेशने, निरज बिसेन, गोविंद बगडे,नरेश वावरे, नितीन तिडके, प्रल्हाद कापगते,जयपाल रूखमोडे, भारत बोरकर, योगेंद्र रामटेके, पुरुषोत्तम गहाणे,नरेश आकरे व इतरही पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.