अर्जुनी मोर. :- स्थानीक शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव च्या वनस्पतीशास्त्र विभागामार्फत सर्टिफिकेट कोर्स इन ऑरगॅनिक फार्मिंग हा कोर्स सन 2023-24 मध्ये सुरू असून त्यामध्ये सेंद्रिय शेतीवर अतिथी व्याख्यान दिनांक 05 ऑक्टोबर 2023 रोज गुरुवार ला आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ईश्वर मोहुर्ले सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय रवींद्र लांजेवार,तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोर. आयक्यूएसी समन्वयक के.जे.सिबि, डॉ.लक्ष्मीकांत बोरकर, प्रा. कैलास लोखंडे, प्रा.अंकित नाकाडे उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मीकांत बोरकर यांनी केलं तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व उपयोगिता यांचे विशद प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी केलं तसंच कोर्स समन्वयक प्रा.कैलास लोखंडे यांनी कोर्स बद्दल माहिती विशद केली त्यानंतर मा.रवींद्र लांजेवार तालुका कृषी अधिकारी यांनी शाश्वत शेती, बीजामृत, जीवामृत व सेंद्रिय शेतीचे महत्व यावर पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होत होते. कार्यक्रमाची संचालन पौर्णिमा झोडे तसेच आभार प्रदर्शन स्नेहल ब्राह्मणकर या विद्यार्थिनींनी केलं.