धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.17-गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात देशाचे 11 वे राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जयंत महाखोडे म्हणाले की, डॉ.कलाम यांचे विद्यार्थी व शिक्षणासाठीचे प्रयत्न व योगदान अतुलनीय आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कलामजींच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पदवीधर विद्यार्थिनी कु. मीनाक्षी कावले हिने कलाम साहेबांच्या जीवनाशी निगडित घटना विषयी उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्नेहा जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मनोज पटले, प्रा. धरमवीर चौहान आणि प्रफुल्ल वालदे यांचे सहकार्य लाभले.