नागपूरची राशी विदर्भात टॉप

0
18

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात नागपूरच्या एमकेएच संचेती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी राशी महाजन हिने ९७.८५ टक्के (६३६) गुण प्राप्त करीत विदर्भात पहिले स्थान पटकाविले आहे. अकोला येथील नाके गोखले कनिष्ठ महाविद्यालयाची गरिमा वर्मा ९७.२३ टक्के गुण प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारती बजाज हिने ९६.९२ टक्के (६३०) गुण प्राप्त करीत तिसरे स्थान पटकाविले. वाणिज्य शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका बदानी हिने ९५.२२ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कला शाखेतून एलएडी महाविद्यालयाची रितिका श्रीवास्तव हिने ९६.६ टक्के (६२८) गुण मिळवीत ‘टॉप’ केले.