गोंदिया, दि.7 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कार्यालयाच्या वतीने मागील दोन वर्षापासून प्रकल्प अधिकारी यांच्या प्रयत्नाने विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने व्यवसाय क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी तसेच स्वत:चा रोजगार निर्माण करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरीता सन 2022-23 मध्ये केंद्रवती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत आय.टी.आय. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना टुल किट पुरवणे अंतर्गत जिल्ह्यातील शिवणकला, मोटार मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर असे विविध व्यवसाय केलेल्या विद्यार्थ्यांना 06 नोव्हेंबर रोजी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व औद्यागिक प्रशिक्षण संस्था देवरीचे प्राचार्य हितेश नंदेश्वर तसेच सहायक प्रकल्प अधिकारी व्ही.पी.गायकवाड व कनिष्ठ लिपीक ताराचंद मडावी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना एकूण 100 टुल किटचे वाटप करण्यात आले.
प्रकल्प अधिकारी यांची प्रतिक्रीया :- आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यवसाय क्षेत्रामध्ये आय.टी.आय. प्रशिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना स्वत:चा रोजगार उपलब्ध होऊन कौटुंबिक उदरनिर्वाह सक्षम होईल व रोजगाराची संधी उपलब्ध होईल या उद्देशाने प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जवळपास 84 विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचा एकमेव उद्देश आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होणे हाच हेतु आहे. |