कोडेलोहारा शाळेत रात्र शाळेचा अभिनव उपक्रम

0
4

तिरोडा,दि.08- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोडेलोहारा येथे एका अभिनव उपक्रमांतर्गत रात्रपाळीची शाळा राबवून मुलांना अभ्यासक्रमाबरोबर,गृहपाठ व सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगल्या सवयी घडाव्यात म्हणून एक प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत सरपंच श्री ठाकरे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच पालक वर्गाने हिरारीने भाग घेतला.कार्यक्रम दरवर्षी वर्षातून एकदा या शाळेमध्ये साजरा केला जातो. शाळेचे मुख्याध्यापक बघेले व इतर शिक्षकानी व्यवस्थित नियोजन करून मुलांच्या व पालकांच्या आणि शिक्षकांच्या एक समन्वय घडवून आणला.या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित गटशिक्षणाधिकारी विनोदकुमार चौधरी,केंद्रप्रमुख डी.सी.हीरापुरे व वि टी डोंगरे तसेच पंचायत समितीच्या सदस्य दिपालीताई टेंभेकर या उपस्थित होत्या.रात्रपाळीच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाची पण व्यवस्था करण्यात आली होती.