#मोदी आवास योजनेत एन टी प्रवर्गला शामिल करा – श्याम मेश्राम
सालेकसा-सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण तापले असताना सुरुवातीला ओबीसी समाजाने स्वतःचे आरक्षण राखीव ठेवता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली होती त्या मागोमाग आता एन टी प्रवर्गातील नागरिकांनी सुद्धा त्यांचे आरक्षण अबाधित राहावे याकरिता तहसीलदार नरसिंह कोंडा गुरले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनाच्या माध्यमातून एन टी समाजाच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये प्रामुख्याने मोदी आवास योजनेचा लाभ ओबीसी समाजा सोबतच एन टी घटकाला सुद्धा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीतील ओबीसी समाजाच्या मागणी नंतर आरक्षणात बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी घेतले असताना यामधील एन टी प्रवर्गाला मिळालेला आरक्षण अबाधित राहूनच पुढील आरक्षण जाहीर करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या सूचीनुसार महाराष्ट्रातील एनटी प्रवर्ग हा केंद्राच्या ओबीसी मध्येच समावेश होतो असे असताना मोदी आवास योजनेचा लाभ एन टी प्रवर्गाला का नाही असा प्रश्न निर्माण केला जात आहे. संघटनेच्या वतीने तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांना निवेदन देवून एन टी प्रवर्गाला आरक्षण अबाधित ठेवून पोलिस पाटील भरती प्रक्रिया मध्ये समाजाचे आरक्षण जैसे थे ठेवण्यात यावे अशी मागणी केली गेली आहे.
#सरपंच महासंघाचा एन टी समाजाला समर्थन
गोंदिया जिल्ह्यातील एन टी समाज बांधवांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी त्यांनी उचलेले पाऊल योग्य आहे. शासनाने मोदी आवास योजनेत एन टी समाजाला सहभागी करून त्यांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावे. केंद्र शासनाच्या यादीत महाराष्ट्रातील एन टी समाज ओबीसी मध्ये गणना होते आणि केंद्राच्या इतर सर्व योजनांमध्ये त्यांना लाभ मिळतो त्या धर्तीवर एन टी समाजाला सुद्धा योजनेत सहभागी करून घेतले पाहिजे. जर शासन एन टी समाजाला न्याय देणार नसेल आणि समाज बांधव आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा पा घेत असतील तर त्यासाठी सरपंच संघटना त्याला समर्थन करणार अशी भूमिका जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी निवेदन देताना भोई ढीवर काहार तत्सम मासेमारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्यामु मेश्राम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र वलादे, कोषाध्यक्ष जयेंद्र बागडे, हौसलाल वलथरे, हेमराज पंधरे, नरेश बागडे, किसनलाल बावनथडे, रवींद्र वलथरे, प्रवीण मेश्राम, श्यामराव वलथरे, सहेसराम तुमसरे, यादोराव नागपुरे, सुरेश तुमसरे व मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.