दुर्गम क्षेत्रात सेवा दिल्याबद्दल मोहन बिसेन यांचा सत्कार

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी –पंचायत समिती देवरी अंतर्गत पालांदूर जमी केंद्रात सेवा दिलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहन बिसेन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मगरडोह तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकरी या अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सेवाभावी संस्थेकडून स्वेटर मिळवून देणे, विविध स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहेत.यावेळी पंचायत समिती सदस्य शालिकराम गुरनुले, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, केंद्राचे केंद्रप्रमुख श्री लंजे तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते