रतनारा येथील एकमेव गणित शिक्षकाची बदली करुन विद्यार्थ्यांचे राऊत यांनी केले नुकसान

0
23

प्रभारी गटशिक्षणाधिकार्याची मनमानी,नियमबाह्य शिक्षकांच्या बदल्यांचा खेळ

प्रभारी गटशिक्षणाधिकार्याच्या कार्यकाळातील व्यवहाराची सखोल चौकशीची मागणी

गोंदिया,दि.09- गोंदिया पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी आपल्या पदाचा गैरवापर करण्यास सुरवात केले असून प्रतिनियुक्तीच्या नावावर शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांचा खेळ सुरु केला आहे.राऊत यांनी सुरु केलेल्या या नियमबाह्य शिक्षकांच्या बदल्यांच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन त्यांचा प्रभार काढून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रतनारा येथील माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच धनपाल धुवारे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार बिजेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा या तक्रार अर्जावर गांभीर्याने लक्ष देण्याएैवजी दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावरच शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

सविस्तर असे की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रतनारा येथे इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे वर्ग असून 472 विद्यार्थी संख्या आहे.१ ते ५ विद्यार्थी संख्या ३०३ व ६ ते ८ ची विद्यार्थी संख्या १६९ आहे. ६ ते ८ मध्ये 2 गणित शिक्षक,२ भाषा शिक्षक व १ सामाजिक शास्त्र असे एकूण ५ पद मंजूर आहेत.२ गणित शिक्षकाचे मंंजूर पदापैकी १ पद १२ सप्टेंबर २३ पर्यंत भरलेले होते.गणित शिक्षक आय.ए.घरसेले विषय हे शिक्षक गणित अध्यापनाचे कार्य करीत असतानाच प्रभारी गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी दि.११/०९/२०२३ च्या आदेशान्वये रतनारा शाळेतून हटवून त्यांना भानपूर केंद्रातील फत्तेपूर शाळेत शैक्षणिक कार्यासाठी बदली आदेश देत रतनारा येथील एकमेव गणित शिक्षकही हिरावून घेतला.जेव्हा की गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकाचे स्थानांतरण करतांना विषयाला प्राधान्य देण्यात येते.जेव्हा की सदर शिक्षकाची कुठलीही तक्रार नसताना ग्रा.पं.सरपंच व पं.स.सभापती यांच्या पत्रान्वये बदली केल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सांगत असले तर त्यांनी घरसेले यांच्याबद्दल आलेल्या तक्रारीची चौकशी का केली नाही अशा प्रश्न उपस्थित केला करीता राऊत यांनी राजकीय दबावात विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याने त्यांची सखोल चौकशी करुन त्यांचे पदभार काढण्यात यावे असे धुवारे यांनी म्हटले आहे.

गट शिक्षणाधिकारी म्हणून राऊत यांनी चौकशी केलेली नाही,चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले असते तर योग्य ती कारवाई करायला हवी होती,परंतु अशाप्रकारे कुठलीच कारवाई न करता राजकीय दबावात संगणमत करुन बदलीची कारवाई करण्यात आल्याने गोंदिया पंचायत समिती अंतर्गत या शैक्षणिक वर्षात झालेल्या सर्वच प्रतिनियुक्त्यासंह राऊत यांच्या कार्यकाळातील कामाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुकाअ यांच्याकडे धुवारे व बिजेवार यांनी केली आहे.राऊत यांनी सभापतींना सोबत घेत 30-35 शिक्षकांच्या केलेल्या नियमबाह्य बदल्यांची सखोल चौकशी शिक्षण सभापती कधी करणार अशा प्रश्न उपस्थित करीत शिक्षकाच्या आनलाईन बदल्यांची गरजच काय असेही तक्रारीत म्हटले आहे.

शाळेत जर दुसरा गणित विषयाचा शिक्षक नसेल तर शिक्षकाची बदली करता येत नाही असे असताना सुद्धा राऊत यांनी खोट्या तक्रारीच्या आधारावर बदली केली.तेव्हापासून आजपर्यंत रतनारा येथील शाळेत गणित विषयाची एकही तासिका न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान प्रभारी शिक्षणाधिकारी व पंचायत समिती सभापतींनी केल्याने विद्यार्थ्यांना गणिताच्या अध्यापासून मुकण्याची वेळ आली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरीत याकडे लक्ष न दिल्यास गावकरी व पालक आंदोलनाचा मार्ग स्विकारतील अशा इशारा तक्रारीतून दिला आहे.