प्राथमिक शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार :आमदार राजू कारेमोरे

0
6

तुमसर दि.06-भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी विधानसभेचे माननीय आमदार राजू करेमारे यांना सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी अन्यायग्रस्त शिक्षकांनी निवेदन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, तसेच मुख्य सचिव, वित्त सचिव व शिक्षण सचिव यांना पत्र लिहून वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी विनंती केली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांशी चर्चा करतांना त्यांनी विषय व्यवस्थीत समजून घेतला व हा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडून याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील राज्य कोअर कमिटी सदस्य दामोधर डहाळे यांच्यासह संघराज डोंगरे, शिवम घोडीचोर, जितेन्द्र मालाधरी, रामदयाल राऊत, अनिल तुरकर, किशोर आंबुडारे, परमेश्वर काळे, अनिल परतेती, सुनील बारेकर, प्रिती बारेकर, माधव कनोजे, जालिंदर कानेकर, दामोदर जमदाळ, प्रेमदास शरणागते, मनोज बांगरे, लिलाधर गेडाम, दिगांबर गेडाम, कुनाल किलनाके, प्रमोद अंबुले, कैलास एस. चव्हाण, विलास घुले, सुनिल कुळमेथे आदी अन्यायग्रस्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच राष्ट्रवादीचे देवचंद ठाकरे अध्यक्ष तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र, योगेश सिंगनजुडे तुमसर शहर अध्यक्ष, उमेश कटरे, मुन्ना पारधी आदी पदाधिकारीही उपस्थित होते.