शहारवाणी हायस्कूलचे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0
21

गोरेगाव,दि.06- तालुक्यातील स्थानिक विकास शिक्षण संस्था गोरेगाव द्वारा संचालित स्व.ब्रीजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी शाळेचे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती राजकुमार यादव यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाला पंंचायत समिती सदस्या चित्रकलाताई चौधरी,शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय. कटरे,से.नी.मुख्याध्यापक एच. बी. पटले,एड.टि.बी.कटरे,
संस्थेचे सचिव यु.टी.बिसेन,संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.टी.पी.येळे,जू.इंजि.जी.टी.पारधी,सरपंच सचिन मेश्राम,
उपसरपंच तुकाराम गौतम,सीएचओ महेश कोठारी,गोंदेखारी सरपंच टि.के कटरे,डॉ.श्रीराम ठाकरे,ग्रा.पं.सदस्य छगनलाल गौतम,अंजना पटले,नरेंद्र मेश्राम,विनोद पटले,देवचंद पटले,व गावातील प्रतिष्ठित मंडळी पालक वृंद सर्व विद्यार्थी सदर मान्यवर उपस्थित होते.3 जानेवारीला बालिका दिन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिक मेळे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष तंटामुक्ती समिती सुरेशकुमार नेवारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवा सहकारी अध्यक्ष एम.टी.गौतम,पोलीस पाटील तेजलाल पटले,उपसरपंच तुकाराम गौतम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हितेंद्र ठाकरे,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष भोजलाल पुरकर,शिक्षक एस.के. शेंडे,माजी ग्रा.प.सदस्य नेत्राम गौतम,डॉ.खेमचंद मेश्राम,शा.व्य.अध्यक्ष संतोष राणे,विनोद गौतम,राजेश पटले व गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थित पार पडले.बक्षीस वितरण कार्यक्रम 4 जानेवारीला केंद्रप्रमुख मंजू वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली गंगाझरी पोलीस ठाण्याचे निरिक्षक महेश बनसोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी डाॅ.ओम बघेले,डॉ.निशांत कारवाडे,डॉ.सम्यक गणवीर,मुख्याध्यापक के.एस.वैद्य,मुख्याध्यापक एस.जे.हरिणखेडे,विषयतज्ञ के.बी. कटरे,प्राध्यापक धर्मवीर चव्हाण,पोलीस पाटील तेजलाल पटले,मुख्याध्यापिका शितल चव्हाण,आशा सेविका सिला डोहळे ,विना डोंगरे ,राजेश्वरी तुरकर,बीट जमादार महेश कटरे,राजेश बिसेन,गावातील प्रतिष्ठित मंडळी पालक वृंद सर्व विद्यार्थीयांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर तीन दिवसीय स्नेहसंमेलनात विज्ञान प्रदर्शनी, बुद्धिबळ, सांघिक स्पर्धा कबड्डी खो-खो वैयक्तिक स्पर्धा लॉंग जंप, 100 मीटर दौड ,सुई दोरा, चमचा गोडी, स्लो सायकल, बोरादौड,,सामूहिक नृत्य,एकल नृत्य, नाटिका.रांगोळी स्पर्धा, पुष्पगुच्छ स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, घेण्यात आल्या सदर सर्व स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता शालेय सर्व कर्मचारी ए.वाय.टेंभरे,ओ.बी.ठाकरे,एस.एल.बडोले,के.के.यादव,सी.के.कटरे, पी.आर.बिसेन,बी.टी.चौधरी, डीएसबीसीन, एल.आर.बुधवार,रेखा बोपचे,कलाबाई चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.